विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे-दौलतराव जाधव
दत्ता पुंडे संपादक राज योग समाचार ९६५७७८३११९
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे-दौलतराव जाधव ; सुरेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात पोलीस स्थापना दिन साजरा
दत्ता पुंडे संपादक राज योग समाचार (सुरेगाव)- विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. जर ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट घेण्याची उमेद निर्माण होते, असे प्रतिपादन कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे. २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात पोलीस स्थापना दिवस रायझिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो, या रायझिंग दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्र म राबविले जात आहेत. त्यानिमित्ताने आज रोजी तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरेगाव कोळपेवाडी येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव निमित्ताने अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोबाइल तसेच व्हाट्सअॅपचा वापर टाळावा, सोशल मीडियावरील भूलथापांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. चांगले शिक्षण घेऊन पुढील ध्येय निश्चित करावे, असा सल्ला दौलतराव जाधव यांच्याकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
त्याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री सोनवणे के.बी. उपप्राचार्य श्री कातकडे एस.बी.पर्यवेक्षक श्री कुदळे सर पोलीस कॉन्स्टेबल श्री.युवराज खुळे साहेब, मा वाखुरे साहेब,सुरेगावचे पोलीस पाटील श्री. संजयजी वाबळे तसेच विद्यालयातील सर्व सेवक इयत्ता दहावी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. गांगुर्डे सर व श्री. मोरे सर यांनी तर सूत्रसंचालन श्री.जुंधारे सर यांनी केले.