ब्रेकिंग
कर वसुलीत पालिकेने टोकाची भूमिका घेऊ नये. पालीकेने नागरिकांची माफी मागावी. सौ. विमल पुंडे
संपादक : दत्ता पुंडे ( योग शिक्षक )
कर वसुलीत पालिकेने असे टोकाचे पाऊल उचलू नये : सौ विमल पुंडे
कोपरगाव : नगरपालिकेला नागरिकांकडून कर वेळेवर मिळालेच पाहिजेत. यात दुमत नाही. कारण करातूनच नागरिकांना नगरपालिका सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु कर वसुली करताना नागरिकांच्या घरासमोर अशा प्रकारे ढोल बडवणे, थकबाकीदार नागरिकांची जाहीर चौकात फलक लावून अशी निंदा नालस्ती करणे अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करणे हे पालिकेला शोभत नाही.
अशा विकृत मानसिकतेतून समाजात द्वेष भावना निर्माण होते. कारण कोणत्याही नागरिकाला कर भरणे चुकत नाही नगरपालिका तो व्याजासकट वसूल करते. नागरिकही हा कर वेळोवेळी भरतात. फक्त काही अडचणी मुळे कधी मागेपुढे होते हे मान्य आहे. म्हणून नागरिकांकडून फार मोठा गुन्हा झाला असे नगरपालिकेने समजू नये.