सौ. सविता साळुंके राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षिका सौ. सविता दीपक साळुंके यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार अमरावती येथे महाराष्ट्र राज्य न.पा. व म.न.पा. शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. अर्जुन कोळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी आमदार रवी राणा, अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, शिक्षक आमदार किरण सरनाईक, सौ. नयनाताई बच्चुभाऊ कडू , दीपक साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील पालीका, मनपा शाळांमधील शिक्षकांमधून निवडक शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत.
आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या सौ. सविता दीपक साळुंके यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गेल्या 30 वर्षे सातत्याने स्वतः विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक आर्थिक जबाबदारी घेऊन प्रतिवर्षी 25 विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. त्यांचा हाच दातृत्वाचा गुण त्यांना पुरस्कार देऊन गेला.
सविता साळुंके यांचे पती महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विश्वासातील जुने कार्यकर्ते आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वतीनेही फोनवरून अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच प्रशासन अधिकारी श्री. पठारे साहेब, प्रशांत शिंदे, सुनील राहणे, सौ. इंगळे, सौ. निंबाळकर, सौ.तेजस शिंदे सौ. कोरडकर श्री. पगारे सर , श्री. खेमनर सर श्री.भोसले सर, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री. शांताराम गोसावी साहेब यांनी व सर्व शिक्षक व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
योग संस्थेच्या वतीनेही महिला योग वर्गात त्यांचा योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.