कोपरगाव : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले हे सरकार आहे. हे सरकार सत्ता खुर्च्या गेलेल्यांच्या डोळ्यात मात्र खूपत आहे.
केवळ राजकीय स्वार्थापोटी गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुकडे तुकडे गॅंग आणि त्यांचे लांगूलचालन करणारे विरोधी पक्ष निव्वळ बोंबाबोंब करत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
राज्यात जाणीवपूर्वक वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. कधी महापुरुषांच्या आडून तर कधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या विषयावरून ही मंडळी निव्वळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे.
-
परंतु अशा कृत्यामुळे समाजाची मने दुभंगली जातील याचे भान त्यांना नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. राज्याला विकासात गतीने प्रगतीपथावर अगदी पहिल्या क्रमांकावर नेण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे , व त्यांचे सहकारी मंत्री व आमदार तसेच खा. सदाशिवराव लोखंडे व इतर नेते मंडळी करत आहे. अशा वेळेस जनहिताची कामे पूर्ण होऊन ती समाजापर्यंत उपयोगी पडावीत यासाठी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे. कोपरगाव येथे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नूतन पदाधिकारी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. विमलताई पुंडे, शहर जिल्हा उपप्रमुख मनील नरोडे, शहर प्रमुख अक्षय जाधव, शहर संघटक विनोद गलांडे, युवा सेना शहर प्रमुख सनी गायकवाड आधी पदाधिकारी व शिवसैनिक खासदार सदाशिवराव लोखंडे, जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, तालुका प्रमुख रावसाहेब थोरात व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्य घेत प्रशासनातील विविध अधिकारी वर्गांना भेटून त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन सन्मानित करत आहे. व विकास कामांसाठी दक्ष राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.