आमचे दादा, ताई, वहिनी, भैया हेच आमचे दैवत ते सांगतील तोच आमचा पक्ष, ते जे सांगतील तीच आमची निशाणी.
संपादक : दत्ता पुंडे ( योग शिक्षक)
- आमचे दादा, ताई, वहिनी, भैया हेच आमचे दैवत ते सांगतील तोच आमचा पक्ष, ते जे सांगतील तीच आमची निशाणी.
कोपरगाव: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारा निमित्ताने मतदारांच्या मोठ्या प्रमाणात भेटी होत आहेत.
खासदार लोखंडे यांचे साठी मतदारसंघ आणि प्रचारादरम्यान मतदारसंघातील काळे गटाला माणणाऱ्या नागरिकांनी हेच सांगितले की, आमचे अशोक दादा हेच आमचे दैवत आहे. आमच्या आशुतोष दादा हेच आमचे नेते आहेत. ताई वहिनी सांगतील तोच आमचा पक्ष असेल ते सांगतील तीच आमची निशाणी आहे.
त्याचप्रमाणे कोल्हे गटाला माणणाऱ्या मतदारांनी हेच सांगितले आमचे बिपिन दादा हेच आमचे दैवत आहे. आमच्या स्नेहलताताई हाच आमचा पक्ष आहे. विकी भैया देतील तोच आदेश आम्हाला मान्य राहील. तोच आमचा पक्ष असेल, तीच आमची निशाणी आहे.
अशा प्रकारची निष्ठा जपणारा काळे आणि कोल्हे परिवाराचा मोठा मतदार या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आहे.
ही निवडणूक देशाची आहे ही गावकीची किंवा भावकीची नाही. ही निवडणूक दिल्लीची आहे.उ गल्लीतली नाही. ही निवडणूक या देशाला पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं सारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले नेतृत्व लाभावं यासाठीची आहे.
त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे. शत्रूवर वचक राहील अशा प्रकारची संरक्षण यंत्रणा आज या देशाची आहे.
पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश गतीने विकासाच्या मार्गावर चालला आहे आणि त्यामुळेच केंद्रामध्ये पुन्हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार राहील. केंद्र आणि राज्याबरोबर कोपरगाव तालुक्याचे अनेक प्रलंबित प्रश्न जसे शेती पाणी, पिण्याचे पाणी, रस्ते, रोजगार, शेतमालाचे भाव आदी प्रश्न या सत्तेच्या माध्यमातून सोडविता येणार आहेत.
शिर्डी मतदारसंघातही केंद्रातील सत्तेतला खासदार हवा. तेव्हा विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही खासदार लोखंडे साहेबांना विजयी करून नरेंद्रजी मोदी यांचे सहकारी म्हणून त्यांना दिल्लीला पाठवणार आहोत.
आम्हाला आमच्या दादांनी, ताईंनी, वहिनींनी, भैयाने तसे आदेशच दिले आहेत आणि संपूर्ण शिर्डी मतदार संघात आम्ही लोखंडे यांना उच्चांकी मताधिक्य कोपरगाव विधानसभा मतदार संघातर्फे द्यायचे. हेच आता आमचे उद्दिष्ट आहे.
अशा प्रकारच्या भावना मतदारांमध्ये आहेत. कोपरगाव शहर व तालुक्यात घेतलेल्या विविध कॉर्नर सभा मधून
विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या या भावना आहेत .
कोपरगाव तालुक्यात काळे, कोल्हे, विखे , परजणे- जाधव, वहाडणे- औताडे , रोहमारे सर्व गट तट, सर्व पक्ष हे देशहितासाठी एक झाले आहेत.
या सर्व मतदारांच्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचविण्याची देशाची सेवा मी करत असल्याचे मनोगत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी व्यक्त केले. त्या कोपरगाव तालुका व शहरातील विविध कॉर्नर सभांमधून मतदारांशी संपर्क साधत आहेत.
कॉर्नर सभांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. केंद्रात मोदींचेच सरकार पुन्हा येणार आहे.
तेव्हा मतदार संघातील विकास कामांसाठी महायुतीचा खासदार निवडून द्यायचा असा ठाम निर्धार मतदारांनी केला आहे.