पोलीस आपले मित्र असल्याचा विश्वास समाजात दृढ व्हावा – दौलतराव जाधव
दत्ता पुंडे संपादक राज योग समाचार ९६५७७८३११९
पोलीस आपले मित्र असल्याचा विश्वास समाजात दृढ व्हावा : पो.नी. दौलतराव जाधव.
दत्ता पुंडे संपादक कोपरगाव – सद्रक्षणाय खल निग्रहणाय’ या ब्रिद वाक्याप्रमाणे सज्जनांचे रक्षणासाठी दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हायला पाहिजे. समाजात कायद्याच्या रक्षणासाठी, गुन्हेगारीच्या समुळ उच्चाटनासाठी, गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी त्यांना शासन झाले पाहिजे. गुन्हेगारांना शासन होण्यासाठी समाज निर्भिडपणे पुढे आला पाहिजे.पोलीस आपले मित्र असल्याचा विश्वास दृढ झाल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून नागरिकांचा विश्वास* संपादन करण्याचं काम पोलिस करत असतात. त्यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन कोपरगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक श्री. दौलतराव जाधव यांनी केले. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिना निमित्त कोपरगाव शहरात योग प्रचार संस्थेच्या वतीने पोलीस दलातील बांधवांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
पोलीससही आपल्या सारखीच हाडामासाची, मन, भावना, बुद्धी असलेली माणसचं आहेत. समाजात पोलीसांची प्रतिमा उंचावण्यासाठी, नागरिक आणि पोलिसात सौहार्दाचे वातावरण तयार करण्यासाठी पी.आय. जाधव साहेब व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत असल्याची भावना योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व सहकारी बांधवांनी योगासने प्राणायाम ध्यान, व संगीताच्या तालावर यौगिक नृत्यात सहभागी होऊन आनंद घेतला.
कोपरगाव पोलीस दलाच्या वतीने समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी निरपेक्ष वृत्तीने काम करीत असलेले योग शिक्षक दत्ता पुंडे व योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांचा सत्कार पो.नि. जाधव साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक श्री दौलतराव जाधव हे आपल्या सुविद्य पत्नी राजश्री जाधव यांचेसह उपस्थित होते. यावेळी एपीआय सुरेश आव्हाड, एएस आय गागरे व नंदा गलांडे, पोलीस हवा. राजेंद्र म्हस्के, बोठे, पोलीस नाईक भगवान ढाका , पोलीस काॅंस्टे.जे. डी. गवारे, युवराज खुळे, अशोक काळे, अंबादास वाघ, अशोक तमनर, अनीस शेख आदी पोलिस दलातील बांधव व योग साधक साधीका मोठ्या प्रमाणात हजर होते. योग शिक्षक दत्ता पुंडे यांनी उपस्थितांकडून योगाभ्यास करवून घेतला.