वनीता मंडळाच्या वतीने सौ विमल पुंडे, सौ पुष्पाताई काळे यांचा सत्कार संपन्न.
संपादक : दत्ता पुंडे संपादक (योग शिक्षक.)
कोपरगाव आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या सर्वात जुन्या अशा महिलांची संघटना असलेली वनिता मंडळातर्फे कन्या विद्या मंदिर कोपरगाव या संस्थेच्या सदस्य पदी सौ. पुष्पाताई काळे यांची निवड झाली म्हणून तर बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदी सौ. विमल पुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या निमित्ताने सौ. पुंडे – सौ. काळे या दोघींचा सत्कार वनिता मंडळातर्फे करण्यात आला.
पदांपेक्षा माणसातील प्रेम अतूट राहील : (सौ विमल पुंडे .) —–
पदं येतील , पदं जातील पण माणसा माणसातील प्रेम अतूट राहते . त्याच प्रेमाची लागवड, जोपासना करायला शिकलं पाहिजे .पद ,पैसा, प्रतिष्ठेपेक्षाही आज माणसाला भावाची, प्रेमाची , उबेची गरज आहे . ती माणसावर प्रेम केल्याने मिळते . असे मनोगत सत्कार प्रसंगी सौ. विमलताई पुंडे यांनी व्यक्त केले.
सकारात आता हार, फुले, शाली, श्रीफळ देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत. : सौ (पुष्पाताई काळे.)सत्कार करण्यास विरोध नाही पण सत्कारात हार तुरे, शाली देण्यापेक्षा माणसात परिवर्तन घडविण्याची ताकद असलेली विचार देणारी पुस्तके भेट द्यायला हवीत. असे प्रतिपादन पुष्पाताई काळे यांनी सत्कार सोहळ्यात व्यक्त केले.
मुलींनी आणि महिलांनी आत्मनिर्भर बनून सदैव दक्ष रहावे : सौ. राजश्री जाधव.
सध्याच्या समाजामध्ये काही लोकात विकृत मानसिकतेने घर केले आहे अशा मानसिकते पासून महिला आणि मुलींनी दक्ष राहायला हवे. सोशल मीडियाच्या प्रभावात न फसता त्यातील फसवणुकीला बळी न पडता निःसंकोचपणे, निर्भीडपणे त्याबद्दलच्या तक्रारी 112 नंबर वर द्याव्यात. तसेच आत्मनिर्भर बनून सतत दक्ष राहायला हवे. असे आवाहन या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. राजश्री दौलतराव जाधव यांनी व्यक्त केले.
-
-
अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या नलिनीताई पटवर्धन रजनीताई गुजराती पुष्पलता सुतार यांचा अभिष्टचिंतन कार्यक्रम मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. नवरात्रोत्सवात विविध स्पर्धांचे झालेले आयोजन व स्पर्धा विजेता महिलांना बक्षीस वितरण समारंभात बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्षा सौ .वंदना चिकटे, रंजना कुलकर्णी, शैला लावर स्वाती मुळे, वैदेही किर्लोस्कर ,विद्या गोखले आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महिला मोठ्या प्रमाणात हजर होत्या.
-