उत्कर्षा रुपवते यांनी यापूर्वी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून तीन वर्षे काम केलेले आहे. 2011 पासून शिर्डी लोकसभा मतदार संघाचे युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
त्या 2007 पासून पक्षाच्या सक्रिय सभासद आहेत. माजी शिक्षणमंत्री मधुकर चौधरी यांचा गांधी विचार व माजी समाज कल्याणमंत्री दादासाहेब रुपवते यांचा आंबेडकरी वारसा आदी विचारांचा प्रभाव व संस्कार त्यांच्यावर आहे. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य असून, त्यांनी युवा संघटन चांगले केले आहे. ज्येष्ठ नेते ऍड. प्रेमानंद रुपवते यांच्या त्या कन्या आहेत.
रुपवते परिवार नेहमी अखिल भारतीय कॉंग्रेसशी निष्ठावंत असा आहे. कॉंग्रेस पक्षाची पारंपारिक गठ्ठा मते ही कोणत्याही शिवसेनेला न जाता ती रुपवतेंकडे वळतील.
ठाकरे गटाच्या वाकचौरेंवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, वेगवेगळ्या पक्षांतून वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढविण्याचा त्यांचा छंद आणि निष्क्रियतेच्या आरोपांमुळे ती सर्व पारंपारिक मते रुपवतेंच्या बाजूला झुकली आहेत.
केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदी विराजमान करण्याची भारतीयांची मानसिकता आहे . तेंव्हा शिवसेना उबाठा गट हा कार्यकर्त्यांच्या दबावाखाली निवडणुकीनंतर कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमधे सहभागी होऊ शकतो. अशी देशाच्या राजकारणात चर्चा सुरू आहे.
खासदार लोखंडे हे मतदार संघात फिरकले नाहीत अशी मतदारांची भावना आहे. शिवाय साखर सम्राटांच्या बालेकिल्ल्यात विकास कामांना हवी ती प्रसिद्धि त्याचं मार्केटिंग करता न आल्याचा मोठा फटका लोखंडेंना बसत आहे.
या अशा काही कारणामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात उत्कर्षा रुपवते यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
प्रबळ उमेदवार म्हणून महायुती आणि मविआ यांच्या पुढे रुपवते यांनी मजबूत पर्याय उभा केला आहे. आता खरी लढत महायुतीचे लोखंडे आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्यातच होईल अशी मतदार संघात चर्चा आहे. खरं खोटं निकालानंतर समजेलच.