गुन्हेगारांवर वचक ठेवणारे कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांचा नागरी सत्कार संपन्न.
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जाधव साहेबांचा नागरी सत्कार संपन्न.
कोपरगाव : तालुक्यात अनेक वेळा घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना त्यांची माहिती मिळताच आपली तपासाची चक्री वेगाने फिरवत अनेक गुन्हेगारांच्या मुद्देमाल व पुराव्यासह मुस्क्या आवळल्या. असे काम आपल्या कारकिर्दीत करत असलेले कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. दौलतराव जाधव साहेब यांचा योग प्रचार प्रसार संस्थेच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण गणपत महाराज लोहाटे उपस्थित होते.
दौलतराव जाधव यांनी मानले कोपरगावकरांचे आभार.
कोपरगावकरांनी वेळोवेळी माझ्या चांगल्या कामाचे कौतुक केले व मला त्यामुळे नेहमीच प्रेरणा मिळाली प्रोत्साहन मिळाले. नागरिकांचे समाधान झाले की काम करण्यासाठी आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना बळ मिळते. कोपरगाव करांचे हे प्रेम आम्ही कधीच विसरणार नाही. असे मनोगत सत्काराला उत्तर देताना श्री. दौलतराव जाधव यांनी व्यक्त केले.
पोलीस खात्याची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी : ह भ प गणपत महाराज लोहाटे.
इच्छा असूनही कायदा आणि वरिष्ठांच्या धाकामुळे कामात चाकोरी सोडून वागता येत नाही. जबाबदारीचे सतत भान ठेवावे लागते. पोलीस खात्याची नोकरी म्हणजे एक प्रकारे सुळावरची पोळीच असते, असे मनोगत ह भ प गणपत महाराज लोहाटे यांनी व्यक्त केले.
उपवास व्रत वैकल्य करणाऱ्या योगसाधिकांचा सत्कार संपन्न.
कोपरगाव : उपवास ही एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक शुद्धिक्रिया आहे. मनावर आणि शरीरावर अंतर बाह्य परिणाम करणारी ही प्रक्रिया अनादी कालापासून आपल्या देशात चालत आहे.
दहा दिवस निरंकार उपवास करणाऱ्या सौ. पुष्पा पांडे तसेच तीन दिवस उपवास करणाऱ्या कविता शाहा यांचा सत्कार योग प्रचार संस्थेच्या वतीने हभप गणपत महाराज लोहाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी योग संस्थेचे अध्यक्ष – योगशिक्षक दत्ता पुंडे, स्वाध्याय परिवाराचे श्री दिलीप सोनवणे, सौ. राजश्री जाधव, सुमित्रा कुलकर्णी ,शारदा सुरळे, वंदना चिकटे , स्वाती मुळे, सारिका भावसार, सुनिता भावसार , अर्चना लाड, कमल नरोडे , सुनीता भुतडा, उमा वहाडणे, उर्मिला लोळगे, शितल नाईक, गिरीशा कदम, वैशाली दिवेकर, छाया खेमनर, पल्लवी भगत, अनिता दातीर, जोती काटकर, पुष्पा जगताप, ऊषा शिंदे, कल्पना सोनवणे, रत्नाताई पवार, ज्योत्स्ना धामणे, वर्षा गंगुले, आदी अनेक योगसाधिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, उपस्थित पाहुण्यांचे आभार योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.