रयत शिक्षण संस्थेने विनम्र सेवाभावी माणसे महाराष्ट्राला दिली. : प्राचार्य शिवाजीराव भोर.
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
-
रयत शिक्षण संस्थेने विनम्र सेवाभावी माणसे महाराष्ट्राला दिली. : प्राचार्य शिवाजीराव भोर.”
येसगाव (कोपरगाव) : कर्मवीर भाऊरावांच्या विचारांवर उभ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेतील सेवकांमध्ये विनम्रता, संयम, शांतता व त्यांच्या सुस्वाभावामुळे ते समाजाची चांगली सेवा करू शकले.
त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना घडविले. रयत संस्थेने या सेवकांच्या परिश्रमावर शंभर वर्षे पूर्ण केली. असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे माजी सचीव प्रा. शिवाजीराव भोर यांनी काढले. ते संस्थेच्या येसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक श्री. अनंत सरदार यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात अध्यक्ष पदावरून बोलत होते.
.या कार्यक्रमात प्रमूख पाहूणे म्हणून सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे ससाकाचे चेअरमन मा. श्री. विवेक भैय्या कोल्हे होते.
” गावा गावात असे विद्यार्थी आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या शिक्षकांच्या सहकार्यामुळे आपला भारत देश पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींजींच्या मार्गदर्शनाखाली महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे संस्कार देणारे व समाज घडविण्याची क्षमता नसलेली शेजारी राष्ट्रे मात्र अधोगतीकडे चालली आहेत. असा सार्थ अभिमान मा. विवेक भैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.
जगात आई आणि शिक्षक कधीच निवृत होत नाही. आईच्या मायेन त्यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांवर त्यांनी प्रेम केले. म्हणूनच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, विविध पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित आहेत.
या कार्यक्रमासाठी मा. श्री. डी. एस. वडजे बापू,
सोसायटीचे चेअरमन सचिन दादा कोल्हे, सरपंच गांगुर्डे , स्कूल कमिटी सदस्य गोरख भाऊ आहेर, बाळासाहेब निकोले, रयत बँकेचे मॅनेजर महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर, जय बजरंग मंडळ विंचूर तालुका निफाड चे अध्यक्ष किरण नवले, कार्यकर्ते देवीसिंग परदेशी, रौप शेख, जीवन आनंदा नागमोते, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय व्यवहारे, छोटू काका विभुते शेतकरी संघटनेचे नेते शंकररावजी दरेकर, विनायक जीवघाले, दत्तात्रेय नागमोते, कोपरगावचे तलाठी भाऊसाहेब तांगडे साहेब, कोपरगाव कडील मित्र श्री शिरसाट साहेब, प्रवीण चंद्र, श्री. रोहम दीक्षित, योग शिक्षक ॲडव्होकेट सौरभ पुंडे, अनेक नातेवाईक पुतणे डॉक्टर प्रतीक सरदार डॉक्टर सौ प्राची सरदार, पुतणी प्रीती जामनेरकर जावई श्री प्रकाश मुरकुटे सो प्रेरणा मुरकुटे , तसेच डॉक्टर सी अमरीश सर डॉक्टर, संजीवनी शाळेची मुख्याध्यापक श्री मोरे सीजी व सर्व स्टॉप, मोतीराम शिंगाडे, कोपरगाव कडील मित्रपरिवार श्री सुनील काळे सुधाकर नरोडे, येसगावचे ग्रामस्थ श्री तांबोळी एडवोकेट पाईक, पाईकसर
मुख्याध्यापक कातकाडे सर, मुख्याध्यापक कोटी सर, मुख्याध्यापक गमे सर, मुख्याध्यापक हंबीर शेख सर, पर्यवेक्षक पिलगर सर, दरेकर सर, जोरे सर, शिक्षक मित्र राजळे सर, जगताप सर, गायकवाड सर, शेख सर , भोये सर , भामरे सर , डुमरे सर चव्हाण सर असे अनेक जण या सेवा पूर्ती कार्यक्रमास उपस्थित होते.
पंचक्रोशीतील शैक्षणिक, व्यापार, राजकीय अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठया संखेने उपस्थित होते.