म्हणून महिलांनी या गोष्टींपासून दूर राहावे – समाजसुधारक श्रद्धा जवाद
दत्ता पुंडे संपादक राज योग समाचार ९६५७७८३११९
म्हणून महिलांनी या गोष्टींपासून दूर राहावे” असे प्रतिपादन समाजसुधारक श्रद्धा जवाद
दत्ता पुंडे संपादक राज योग समाचार ( कोपरगाव ) – आज कालच्या विद्यार्थ्यांना खास करून तरुण पिढीला आणि मुलींमध्ये देखील मोबाईल तसेच सोशअल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुण मुले / मुली दररोज आपला प्रोफाईल व स्टेट्स बदलतात परंतु मुलींनी असे करणे घातक आहे. मी मुलींच्या किंवा महिलांच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाही, उलट त्यांच्या हितासाठी सांगू इच्छिते की या गोष्टी मुलींसाठी नक्कीच चांगल्या नाहीत. कारण यातून महिलांची आणि तरुण मुलींची फसवणूक होऊ शकते, त्यांच्यावर कठीण प्रसंग येऊ शकतो. म्हणून महिलांनी या गोष्टींपासून दूर राहावे” असे प्रतिपादन समाजसुधारक श्रद्धा जवाद यांनी येथे केले. स्थानिक के जे सोमय्या महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी एस. यादव म्हणाले की, “विद्यार्थिनींनी शिकले पाहिजे, शिकता शिकता संशोधन आणि लेखन केले पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थिनींनी आपल्या हक्क आणि अधिकाराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आलेल्या विद्वान वक्त्या ऍडव्होकेट श्रद्धा जवाद मॅडम यांच्या व्याख्यानातून बोध घेऊन स्रीयांविषयी असलेल्या कायद्यांची माहिती करून घेतली पाहिजे व आपल्या भविष्याबद्दल जागरूक राहिले पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख प्रा.नीता शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुलेंच्या जीवन कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. त्याचबरोबर देशात महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या ‘बेटी बचाव बेटी पढाओ’, ‘महिला हेल्पलाईन योजना’, ‘उज्ज्वला योजना’, ‘सपोर्ट ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमेन’ ‘महिला सशक्तीकरण केंद्र’, तसेच ‘महिलांसाठी आरक्षण’ इत्यादी योजना यासंदर्भात उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. कोमल म्हस्के यांनी केले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीं ची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महिला सबलीकरण कक्ष च्या सदस्य प्रा. वर्षा आहेर प्रा. जयश्री रहाणे,प्रा. लीना त्रिभुवन ,प्रा. भावना साने, तसेच इतर महिला प्राध्यापिका आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे तसेच अन्य प्रशासकीय सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.