रांगोळी स्पर्धा
संपादक दत्ता पुंडे – समता नागरी सहकारी पतसंस्था आणि कालांश राजगीरा लाडू चिक्की व रंगकला प्राँडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे सलग सहाव्या वर्षी रांगोळी स्पर्धेचे आयोजन एक घर , एक रांगोळी या उपक्रमांतर्गत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत केंद्र व राज्य सरकारने कोरोना विषयी घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येत असून हि स्पर्धा फक्त कोपरगाव तालुक्यातील स्पर्धकांसाठी विनामूल्य आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील स्पर्धकांमधील कला-गुण विकसित करण्याची सुवर्णसंधी समता उपलब्ध करून देत असल्याची माहिती समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली. तरी सर्व महिला नी आपल्याला घरासमोर काढलेल्या रांगोळी चा रांगोळीकाढतांना चा स्वतःचा फोटो व रांगोळी पुर्ण झाले ला फोटो असे दोन्ही फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून आयोजकांना या ९१५८२७६६८५, ९५०४९५९५१०, ९८२२५२८३२८ व्हाँटसप नंबर वर पाठवा व आपले नांव, गाव, मोबाईल नंबर रांगोळी च्या फोटो खाली लीहून पाठवावी, अधिक माहिती साठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे अव्हान कालाश उद्योग समुहाचे रोहित काले यांनी केले आहे .