ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोपरगाव शहरातील योग साधीकांनी साजरा केला अनोखा गणेशोत्सव.

संपादक:- दत्ता पुंडे

 

कोपरगाव शहरातील योग वर्गातील महिलांनी साजरा केला अनोखा गणेशोत्सव.

कोपरगाव:- कोपरगाव शहरात गेल्या बावीस वर्षांपासून चालू असलेल्या योग वर्गातील महिला कोवीडच्या निर्बंधांपासून सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा करत आहेत. हा उत्सव साजरा करण्यासाठी कुणाकडूनही ना वर्गणी घेतली जाते, ना शुल्क आकारले जाते. येथे ना मंडप उभारला जातो ना स्टेज. यावेळी ना मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, ना सजावट. ना कुठलाच आर्थिक व्यवहार केला जातो.

प्रत्येक साधीका आप आपल्या घरी वैयक्तिक रित्या कुटुंबात श्री गणेशाची स्थापना करुन सगूण स्वरूपात मनोभावे श्रीगणेशाची भक्ती करतातच. त्याच बरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला साथ म्हणून समाजाने सर्व प्रकारचे भेदभाव गाडून एकत्र यावे. ऐक्य भावना प्रस्थापित व्हावी. त्यांच्यात कृतज्ञता भाव निर्माण व्हावा. त्यांनी संघटीत होऊन ईश्वर भक्ती करावी. तसेच उभ्या राहिलेल्या संघ शक्तीचा उपयोग समाजासाठी, देश, देव धर्मासाठी होणं अपेक्षित आहे. ही सार्वजनिक गणेशोत्सवाची खरी संकल्पना आहे.
ही संकल्पना जोपासण्यासाठी महिलांकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठीच योग संस्थेच्या महिलांनीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे चालू केले आहे.
अगदी पहाटेच्या वेळी कुणालाही कशाचाही व्यत्यय न होऊ देता, सर्व महिला मोठ्या भक्तिभावाने निर्गुण निराकार स्वरूपातील श्रीगणेशाचे स्मरण करून आरती करतात. तसेच आरोग्य देवता सूर्य नारायणाची उपासना करुन आरती करतात.

शहरातून वाहत असलेल्या, दक्षिण गंगा संबोधले जाते ती गोदावरी नदी जी हजारो वर्षांपासून या परिसराला सुजलाम सुफलाम करत आहे. त्या गोदावरी मातेची कृतज्ञता म्हणून नदीची स्वच्छता व नदीचे पावित्र्य राखण्यासाठी स्वतः शपथ घेतात. व समाजातही जनजागृती करतात. नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा कचरा, घाण, अगदी निर्माल्य सुद्धा टाकणार नाही व इतरांना सूद्धा प्रवृत्त करतात.गंगा गोदावरी मातेचीही मोठ्या भक्तिभावाने पूजन व आरती केली जाते.

गणेशोत्सव दरम्यान गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींना प्रोत्साहन पर पुरस्कार करुन आत्मविश्वास वाढविला जातो.शहरातील विविध क्षेत्रात नाव लौकीक मिळवत असलेल्या कर्तृत्ववान महिलांना आरतीचा सन्मान देऊन त्यांना सत्काराने सन्मानित करण्यात येते.
गणेशोत्सवाची सांगता करताना रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल म्हणून रस्त्यावर कोणताही कार्यक्रम न करता नदीकिनारी घाटावरच योग साधीका मिरवणुकीचा आनंद घेतात. यौगिक गीते, गणेश स्तोत्र, धार्मिक भावगीतं गात, फेर धरून यौगिक नृत्य करतात.

या उत्सवात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. ही सर्व संकल्पना योग शिक्षक दत्ता पुंडे व योग शिक्षिका विमल पुंडे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या कार्यात योग संस्थेच्या अनेक योग साधीका परिश्रम घेत असतात.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

दत्ता पुंडे

सदरील राज योग समाचार न्युज वेब पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - दत्ता पुंडे 9657783119 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे