ब्रेकिंगमहाराष्ट्र
खोट्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच प्रहार केले – पुंडे
दत्ता पुंडे
खोट्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच प्रहार केले – पुंडे
कोपरगाव दत्ता पुंडे – खोट्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच प्रहार केले. मतांच्या राजकारणासाठी विशिष्ट धर्माच्या लोकांचे लांगुलचालन करतांना हिंदूंना सापत्न भावाची वागणूक देणाऱ्या राजकारण्यांवर बाळासाहेब नेहमीच परखडपणे टिका करत. या देशात हिंदूंना तुम्ही हिंदू आहात त्याचा गर्व बाळगा व तुमच्या मतांची किंमत ओळखा ही जाणीव करून दिली. असे मनोगत योग साधीकांचे वतीने अभिवादन करताना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विमल पुंडे (योग शिक्षिका) यांनी व्यक्त केले.