हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
कोपरगाव दत्ता पुंडे – प्रभागातील विकास कामांचा शुभारंभ, रक्तदान शिबिर, वाचनालय, प्रतिमा पुजन, शिवसेना शाखा उद्घाटन, विविध स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांनी कोपरगाव शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. कोपरगाव शहरात प्रभाग क्रमांक पाच मध्ये तसेच बस स्थानका समोर, विघ्नेश्वर चौक, ज्ञानेश्वर शाॅपिंग सेंटर, शिवनेरी चौक, सुभाष नगर, टिळक चौक, भगवा चौक- गांधीनगर आदी विविध भागात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा बँक संचालक युवक नेते विवेक कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, पराग संधान, ऐश्वर्या सातभाई, अतुल काले, निलेश धुमाळ, मा. उप जिल्हाप्रमुख कैलास जाधव, दत्ता काले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ सपनाताई मोरे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, नगर सेवक योगेश बागूल, सौ. वर्षाताई शिंगाडे, जनार्दन कदम, गोदावरी प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे, सनी वाघ, कहार समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र चे अशोक लकारे, शहरप्रमुख कलविंदर दडियाल, विरेन बोरावके, ज्ञानेश्वर गोसावी, भरत मोरे, राखीताई विसपुते, अक्षिता आमले, मनसेचे सुनील फंड, अनिल गायकवाड, गोसेवक अमीत लोहाडे, नगर सेवक हाजी मेहमूद सय्यद, अस्लम शेख, संतोष गंगवाल, संतोष होने, शिवसेना ,भाजप, मनसे, आरपीआय, महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभिवादन केले.
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा