सुदृढ, निरोगी, बुद्धीमान, तेजस्वी, विनम्र झालेला समाज भारत मातेला अपेक्षित – विमल पुंडे
दत्ता पुंडे संपादक राजयोग समाचार
सुदृढ, निरोगी, बुद्धीमान, तेजस्वी, विनम्र झालेला समाज भारत मातेला अपेक्षित – विमल पुंडे
कोपरगाव :- मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी सुदृढ आरोग्य, बुद्धीमत्ता, तेजस्विता, विनम्रता हवी. हे लाभण्यासाठी ‘योग’ साधना हाच एकमेव राजमार्ग आहे. असे मनोगत योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कोटी सुर्य नमस्कार संकल्प अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनी भारतभर एकाचवेळी सुर्य नमस्काराने राष्ट्र वंदना हा कार्यक्रम सादर करण्यात आला. योग प्रचार प्रसार संस्था, गीता परिवार, राष्ट्र सेविका समिती कोपरगाव यांनी कोपरगाव शहरातही खा. सुर्यभान पा.वहाडणे घाटावर कार्यक्रम संपन्न केला. सुर्य नमस्कार सादर करुन भारत माते प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, डॉ.सौ.सुषमा आचारी, आदीनाथ ढाकणे, स्टेट बँकेचे संजय कदम, दिलीप सोनवणे, लायनेस भारती शिरोडे, सौ. राजश्री दौलतराव जाधव, ऊमा विजय वहाडणे, ॲड.शार्दुल देव, रविंद्र भगत, मधुमीता निळेकर, पुजा शुक्ला, सुमित्रा कुलकर्णी, अर्चना लाड, गिरीषा कदम, रत्ना पवार, कविता दरपेल, शोभा कानडे, शितल चव्हाण, स्नेहल भोसले, हर्षाली बागड, जोती वालझडे, स्मिता कुलकर्णी, ज्योत्स्ना धामणे, अभिमन्यू पुंडे, प्रसाद पुंडे, वर्षा वरखेडे, जयश्री गुजराती, जोती काटकर, रंजना भोईर, सुजाता कोपरे, शितल आमले, कल्पना सोनवणे, वंदना चिकटे, सारीका भावसार, सुनिता भावसार, विद्या गोखले, भारती शिरोडे, पूजा ऊदावंत, सुप्रिया निळेकर, रोहिणी पुंडे, कवीता शहा, पल्लवी भगत, सोनाली जाधव, राधीका जाधव, शारदा सुराळे, रत्ना पाठक, ऊर्मिला लोळगे, सायली वाजे, सुनंदा भगत, हर्षाली बागड, लीना शेळके, प्रतिभा दरपेल, सुवर्णा दरपेल, जया आमले,मनीषा कुलकर्णी, मयुरी कानकुब्जी, प्रिती कानकुब्जी, निर्मला भगत, अनिता दातीर, स्नेहा इश्वरे, जया आमले, सुजाता कोपरे, रेणुका आमले, अरुणा वाकचौरे मनीषा बारबिंड, पुजा शुक्ला, लता भामरे, उषाताई शिंदे आदी अनेक योग साधिका मोठ्या प्रमाणात हजर होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. सुनिता भुतडा, ॲड. सौरभ पुंडे, सुमित्रा कुलकर्णी, आशुतोष शिवाळ, विमल राठी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित योग साधकांकडून योग शिक्षक दत्ता पुंडे यांनी शारीरिक हालचाली, सुर्य नमस्कार व यौगिक प्रक्रिया करवून घेतल्या.