ब्रेकिंगमहाराष्ट्र

शहरातील तरुणांना मैदानासाठी प्रयत्न करणार – शिवसेना संपर्कप्रमुख निलेश धुमाळ

दत्ता पुंडे +91 96577 83119

शहरातील तरुणांना मैदानासाठी प्रयत्न करणार – शिवसेना संपर्कप्रमुख निलेश धुमाळ

कोपरगाव दत्ता पुंडे – मुंबादेवी तरुण मंडळ व कोपरगाव तालुका क्रीकेट असोसिएशन वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना नेते कै.अँड.दिपक अण्णा माळी स्मरणार्थ सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा क्रीकेट हा आवडीचा खेळ राहिला आहे. कोपरगाव तालुक्यासह परिसरातील नवोदित क्रीकेट खेळाडूंना अद्ययावत क्रीडा मैदानात मिळण्याची नियोजनाची गरज असून नगरविकास मंत्री यांचे कडे सर्वांचे सहकार्यातून आपण प्रयत्न करणार असल्याचे कोपरगावचे भुमी पुत्र व भंडारा गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांनी सांगितले.

मुंबादेवी तरुण मंडळ व कोपरगाव तालुका क्रीकेट असोसिएशन वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व अँड.दिपक अण्णा माळी स्मरणार्थ सरसेनापती चषक स्पर्धेचे आयोजन २५ वर्षांपासून बाजारतळ कोपरगाव येथे करण्यात येत आहे.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावचे भुमी पुत्र व भंडारा गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, बाळासाहेब रुईकर पाटील, कोपरगाव शिवसेनेचे पहिले संघटक शिवनारायण परदेशी, स्वच्छतादूत सुशांत घोडके,एस.टी.कामगार सेनेचे किरण बिडवे, ज्येष्ठ नागरिक उद्धवराव विसपुते, नरेंद्र टायर्सचे सुनील बंब, माजी नगरसेवक अनिल जाधव, मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड, कोपरगाव तालुका क्रीकेट असोसिएशनचे सचिव मनोज कपोते हे प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक २१ हजार व चषक, व्दितीय पारितोषिक ११ हजार, तृतीय पारितोषिक ७ हजार पाचशे, चतुर्थी ५ हजार तसेच मॅन ऑफ व सिरिज,मॅन ऑफ व चषक या सह अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.या स्पर्धेत सुमारे ३२ संघांनी सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेकरिता डॉ.नाईकवाडे हाॅस्पिटल, मित्र फाऊंडेशनचे वैभव आढाव,अंबिका तरुण मंडळाचे शुभम गायकवाड,माजी नगरसेवक कालु आव्हाड,भरत मोरे,गगन हाडा, रविंद्र कथले,गुरुकृपा मेडिकल यांचे सह अनेकांचे सहकार्य लाभले आहे.

उद्घाटनाचे दिवशी फ्रेंड्स ईलेवन आणि कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी यांच्यात हा सामना खेळला गेला.सामन्याचे पंच म्हणून पवन शिंदे आणि तुषार विध्वंस यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महेश आमले, राहुल देवळालीकर, रोहित खंडागळे, ओम कपोते, निलेश गंगवाल, मनोज विसपुते, समर्थ दिक्षित, विवेक फंड, राजेंद्र गवळी, विजय उदावंत, अरविंद मंडलिक यांचे सह मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य, कोपरगाव तालुका क्रीकेट असोसिएशनचे सदस्य आणि क्रिकेट प्रेमींचे सहकार्य लाभले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

दत्ता पुंडे

सदरील राज योग समाचार न्युज वेब पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - दत्ता पुंडे 9657783119 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे