ग्रामीण भागातील महिलांनी रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. : डॉ. नितीन बडदे.
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
‘ग्रामीण भागातील महिलांनी रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.’ : डॉ. नितीन बडदे.
कोपरगाव (पोहेगाव) :
अतिश्रमाची कामे, चुकीचा व असंतोल, अनियमित आहार, चौरस आहाराचा अभाव , यामुळे हिमोग्लोबिन कमी होते.
ग्रामीण भागातील विशेषता अवर्षणग्रस्त भागातील महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळत आहे. त्यातूनच ॲनिमिया सारख्या आजारांना महिलांना सामोरे जावे लागत आहे .
त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. व विविध शिबीरांचा लाभ घेण्यासाठी आवाहन डॉक्टर नितीन बडदे यांनी केले आहे.
पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शासनाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत जवळके रांजणगाव काकडी या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन केले आहे.
महिलांसाठी योग सत्र रक्ताच्या तपासणी गरोदर माता तपासणी ए एन सी, एन सी डी क्लिनिकद्वारे महिला रुग्णांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
डॉक्टर नितीन बडदे यांचे मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश मस्के डॉक्टर सुधीर वाणी डॉक्टर नेहा वाघमारे परिश्रम घेत आहेत.
नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत संवेदनशील राहण्यासाठी महिलांमध्ये अशक्तपणा चक्कर येणे त्वचा निस्तेज व पांढरी पडणे असे ग्रामीण भागात रुग्ण आढळत आहेत. अशा रुग्णांना आरोग्याच्या विविध तपासण्या नियमितपणे करणे. जीवनशैलीत सुधारणा, सकस, चौरस आहार घेणे यासाठी प्रबोधन केले जात आहे.
आहारात ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, फळांचा , कडधान्ये व डाळींचा समावेश वाढविण्यावर भर देण्यास सांगितले जात आहे.
या अभियानामध्ये जवळके आरोग्यवर्धिनी केंद्राकडून आरोग्य सेविका जयश्री फटांगरे, ओहोळ अण्णा, आशा सेविका मीरा नेहे, वंदना थोरात, सुनिता घारे, वनिता पाचोरे, आशा गायकवाड, सुनिता गायकवाड, मीना माळी, या परिश्रम घेत आहेत.
रांजणगाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामार्फत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश म्हस्के, आरोग्य सेविका के.टी. कदम आशा सेविका अमृता गव्हाणे, सारिका महालकर, सविता बिडवे , माया देशमुख, शितल गव्हाणे, मंगल राहाणे, आशा राहणे, सुरेखा गव्हाणे या उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
काकडी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंतर्गत डॉ. सुधीर वाणी व त्यांच्या बरोबर आरोग्य सेविका हिरा जाधव, आशा सेविका अनिता गुंजाळ, भारती सोनवणे जयश्री डांगे, कविता गोरे या विशेष परिश्रम घेत आहेत.