चास नळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत महिलांना आरोग्य बाबतीत समुपदेशन.
संपादक: दत्ता पुंडे (योग शिक्षक)
प्राथमिक आरोग्य केंद्र चास नळी विभागात महिला रुग्णांना ‘माता सुरक्षित तर…’ अभियानात समुपदेशनाने दिलासा.
चास नळी (कोपरगाव): प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांचे कार्यक्षेत्रात, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानासाठी मोठ्या प्रमाणात महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
चासनळी ,सांगवी भुसार, धामोरी आदी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामध्ये योग सत्र , रक्त तपासणी, गरोदर माता तपासणी, ए एन सी, एन सी डी क्लिनिक द्वारे महिला रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये सुद्धा जीवनशैलीतील बदलांमुळे असंसर्गजन्य आजारांचा शिरकाव वाढत आहे.
या अभियानात आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली व डॉक्टर देसाई यांचे सहकार्याने या विविध शिबिरांचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले जात आहे.
आरोग्य सेवक रमेश इंगळे, सीमा धेनक , शितल मस्के, दिपाली वैद्य, नीता ससाने, आशा धेनक, स्वाती मजकुले, नलिनी गडाख, भारती सोनवणे यांचे मोठे योगदान लाभत आहे.
सांगवी भुसार व धामोरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र परिसरातही माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात महिलांच्या विविध तपासण्या, गरोदर माता तपासणी ए एन सी, एन सी डी क्लिनिक द्वारे महिलांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जात आहे.
-
त्यांना आरोग्याच्या बाबतीत, योगाभ्यास, आहार विहार साठी, समुपदेशन करुन जीवनशैलीवर लक्ष देण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
कष्टकरी शेतकरी महिलांमध्ये मधुमेह व मणक्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाठ दुखी कंबर दुखी, मानदुखी ने महिला त्रस्त आहेत.
महिलांसाठी योग सत्रांचे विशेष आयोजन केले जात आहे. त्यातून जीवनशैलीत, आहार विहारात बदल करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येत आहे.
यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुवर्णा काळे, डॉक्टर नेहा वाघमारे, आरोग्य सेविका सी.एल. आरखडे , आशा सेविका कविता हराळे , मिरा शिरसाट, मनीषा जाधव, निर्मला जगताप, मनीषा गायकवाड , सुवर्णा अटकरे, रेखा आहेर, गीता शेलार, सीमा कदम आदी सर्व आशा सेविका परिश्रम घेत आहेत.