येसगाव येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात योग शिक्षिका विमल पुंडे यांचे महिलांसाठी समुपदेशन व योग शिबिर संपन्न.
संपादक : दत्ता पुंडे ( योग शिक्षक )
येसगाव येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात योग शिक्षिका स्वाभिमान पुंडे यांचे महिलांसाठी समुपदेशन व योग शिबिर संपन्न.
कोपरगाव (येसगाव ): -कुटुंबाची काळजी घेत असताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आजाराकडे दुर्लक्ष केल्याने अनेक महिलांना दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समतोल, सकस, चौरस आहारा अभावी महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळत आहे. त्यामुळे अशक्तपणा येऊन अनेक व्याधींना महिलांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच महिलांचा शोषिक हा स्थायी स्वभाव असतो. आजाराच्या सुरुवातीस दुर्लक्ष करण्याच्या या स्वभावामुळे महिलांमध्ये व्याधींचे प्रमाण वाढत आहे.
येसगाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात या अभियानास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. असिफा पठाण यांचे मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सौ. वर्षा मेमाणे व आरोग्य सेविका सौ प्रतिभा वाघ यांनी महिलांच्या समुपदेशनावर अधिक भर दिला आहे. त्याचे सुपरिणाम आरोग्य शिबिरामधून दिसत आहेत.
महिला स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवित आहे. या अभियानांतर्गत योग शिक्षक सौरभ पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्रे , उंची व वजन नोंदी, रक्त तपासणी, गरोदर माता तपासणी, एएनसी व एन सी डी क्लिनिक मधून मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत आहेत.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रतिक्षा साबळे, आशा सेविका सुमन भालेराव, अरुणा मोरे, नीता गायकवाड, संगीता चिंचोले, जिजा देशमुख, उषा चिंचोले या उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.