ग्रामीण महिलांमध्येही उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णात वाढ : डॉक्टर संकेत पोटे
ग्रामीण महिलांमध्येही उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णात वाढ : डॉक्टर संकेत पोटे
कोपरगाव : टाकळी- ब्राह्मणगाव परिसरात माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत महिलांसाठी अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संकेत पोटे यांनी महिलांमध्ये आरोग्यासाठी समुपदेशनावर भर देत या अभियानाला गती दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे. ए. एन सी आणि एनसीडी क्लिनिक मधून मोठ्या प्रमाणात रुग्णांना सेवा मिळत आहे.
ग्रामीण भागातील महिलांमध्येही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढ होत असल्याचे या अभियानात आढळून आले आहे.
गरोदर मातांची चाचणी व संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे रुग्णांना समजावले जात आहे. योग सत्रांचे आयोजन वाढविले आहे. या अभियानात आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध तोडकर व डॉक्टर असिफा पठाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
आरोग्य सेविका संगीता कचेरे, सरिता मैंद, गावडे , दत्तात्रय आहेर , सचिन सोनवणे आशा सेविका शिला पाईक, निला सहानखोरे, सविता मोरे, शितल महाजन , वैशाली कुमावत, सोनाली बर्डे, अलका अष्टेकर, मनीषा बंड, नंदा लोखंडे यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
येसगाव, मुर्शतपूर येथे माता सुरक्षित अभियानात महिलांचा मोठा सहभाग
कोपरगाव : येसगाव व मुर्शतपूर आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामधून माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत महिलांसाठी योग सत्रांचे व समुपदेशन आयोजन करण्यात आले. विविध आरोग्य शिबिरात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा मेमाने व डॉक्टर रेखा सदाफळ यांनी दिली. महिलांसाठी विविध चाचण्या, गरोदर माता तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी साठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .
आरोग्य अधिकारी डॉक्टर तोडकर व डॉक्टर असिफा पठाण यांचे मार्गदर्शन मिळत आहे . या शिबिरासाठी आरोग्य सेविका प्रतिभा वाघ व मीरा माळी आशा सेविका सुमन भालेराव, अरुणा मोरे , गायत्री पंडित, मीना मुंडे, वैशाली शिंदे , उषा शिंदे, उषा गुंजाळ, कल्पना देशमुख, नीता गायकवाड, संगीता चिंचोले या कठोर परिश्रम घेत आहेत.