छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन शानदार सोहळ्याच्या आयोजनात संपन्न
दत्ता पुंडे संपादक राजयोग समाचार
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन शानदार सोहळ्याच्या आयोजनात संपन्न
कोपरगाव दत्ता पुंडे – छत्रपती शिवरायांच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती पदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले. स्वाभिमान दिला, आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये एका अनभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात या हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती पदामुळे निर्माण झाला. ते केवळ पद राहिले नाही, तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. विधर्मी, धर्मांध, परकीय जुलमी मोगलांची सत्ता, व्यवस्था संपुन लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते.
शिवरायांच्या व धर्मवीर संभाजी महाराजांच्या देव, देश धर्म आणि संस्कृती साठी असलेल्या योगदान, बलीदान व विचारांचा प्रभाव प्रत्येक भारतीयाच्या मनात निरंतर टिकून रहावा म्हणून असे शिवराय व शंभूराजांच्या जीवनातील अनेक उत्सव, प्रसंगांच स्मरण नियमित होत राहील.
कोपरगाव शहरात एक अराजकीय अशा छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समीतीने हा सोहळा आयोजित केला.
त्यांनी आखलेल्या या शानदार सोहळ्यात विविध, राजकीय पक्षातील, विविध समाजातील, हिंदुत्ववादी विचारांचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. ध्वजारोहण, शिवपूजन, पालखी सोहळा, संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, आरती असा भरगच्च कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व कोरोणाची खबरदारी घेत संपन्न झाला.
संभाजी महाराजांच्या स्मारक स्थळी अभिवादनासाठी भाजपा प्रदेश सचिव मा. आ. स्नेहलता ताई कोल्हे, अप्पासाहेब दवंगे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, मा.नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे कलविंदर दडियाल विमलताई पुंडे, विक्रांत झावरे, उमाताई वहाडणे, विजय वाजे, विरेन बोरावके, सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे, बाळासाहेब आढाव, रविंद्र पाठक, राजेंद्र वाकचौरे, वैभव आढाव, मनसेचे सुनील फंड, जितेंद्र रणशूर,.. विविध राजकीय, सामाजिक, व्यापार, धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पालखीचा मान योग प्रचार प्रसार संस्थेच्या महिला साधीकांना देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध राजकीय पक्षांतील शिव शंभू भक्तांनी मोठे परिश्रम घेतले.