मुलांमधील जंतनाशकासाठी ब्राह्मणगाव आरोग्य वर्धिनी केंद्र सज्ज. डॉ. संकेत पोटे
संपादक : दत्ता पुंडे ( योग शिक्षक )
मुलांमधील जंतनाशकासाठी ब्राह्मणगाव आरोग्य वर्धिनी केंद्र सज्ज. डॉ. संकेत पोटे
ब्राह्मणगाव- कोपरगाव : लहान मुले बाहेर खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
बालकांमध्ये आढळणाऱ्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाच्या आरोग्य खात्याने अगदी वाडी वस्ती पर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत. ब्राह्मण गाव आरोग्य वर्धिनी केंद्रा मार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून उपकेंद्र येथे प्रशिक्षण शिबीर तसेच योग अभ्यास शिबीर चे आयोजन करण्यात आले.
आशा सेविका, अंगणवाडी शिक्षिका – सेविका , शिक्षक , आरोग्य सेवक, आरोग्य सेविका संबंधित सी एच ओ यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या दिवशी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, गोळ्या कोणास द्यावयाच्या ,जंत तयार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, हात धुण्याच्या विविध पद्धती, गोळ्या देण्यामागची कारणे, गोळ्या कोणास देऊ नये याबाबत प्रात्यक्षिकांसहा योग्य ती माहिती देण्यात आली.
१० ऑक्टोबर रोजी विविध कारणास्तव उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांना १७ तारखेला म्हणजेच मॉक अप दिनानिमित्त गोळ्या द्याव्यात या संबंधी माहिती देण्यात आली. आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना संबंधित मोहिमेसाठी लागणाऱ्या जंतनाशक गोळ्या तसेच प्रसिद्धी साहित्याचे वाटप करण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्यासाठी सतत परिश्रम करणाऱ्या आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका , मदतनीस या सर्व कर्मचाऱ्यांचेही आरोग्य उत्तम रहावे या साठी त्यांना योगाभ्यास घडावा म्हणून योग सत्र आयोजन करण्यात आले. यावेळी योग शिक्षक सौरभ पुंडे उपस्थित होते.
तसेच सी. एच. ओ. डॉ. संकेत पोटे, आरोग्य सेविका सरीता मैंद, शामराव गावडे, आशा सेविका नंदा लोखंडे, वैशाली कुमावत, अलका अष्टेकर, मनीषा बंड, सोनाली बर्डे, अंगणवाडी सेविका जोती वाकचौरे, कविता जोशी, माधुरी आहेर, शोभा जोशी, लता शिंगाडे, अनुपमा सोनवणे आदी सहकारी उपस्थित होते.