ब्रेकिंग

कर्तबगार महिला, नव दुर्गांचा सन्मान हाच खरा नवरात्रोत्सव.: सौ. पुष्पाताई काळे.

संपादक : दत्ता पुंडे ( योग शिक्षक )

 

 

कर्तबगार महिला, नव दुर्गांचा सन्मान हाच खरा नवरात्रोत्सव : सौ.पुष्पाताई काळे

 

कोपरगाव :  घर ,कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जोपासतात. समाजाचा ऋण फेडण्यासाठी, समाजासाठी अहोरात्र झटतात. अशा कर्तबगार नवदुर्गांचा सन्मान करणे आम्ही महत्त्वाचं मानतो.’ असे गौरवोद्गार प्रियदर्शनी महिला मंडळाच्या प्रमुख सौ. पुष्पाताई काळे यांनी काढले.‌

कोपरगाव शहरात महिला योग वर्गाचा सन्मान करताना त्यांनी विशेष कौतुक केले. कोपरगाव शहरात शारदीय नवरात्रोत्सवात प्रियदर्शिनी मंडळाचे वतीने महिलांसाठी अनेकविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात आहे. कोपरगाव शहरात महिलांसाठी गेल्या बावीस वर्षांपासून योग संस्थेच्या वतीने नि: शुल्क योग वर्ग चालविला जात आहे. योग संस्थेच्या संस्थापिका, योगशिक्षिका सौ विमल पुंडे यांचा व त्यांच्या सहकारी योगसाधिकांचा सत्कार सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांना आरतीचा सन्मानही देण्यात आला.

 

यावेळी योगशिक्षिका विमल पुंडे त्यांचे समवेत सुनिता भुतडा, सुमित्रा कुलकर्णी, स्नेहल भोसले, सारिका भावसार, कमल नरोडे , कविता दरपेल, कविता शहा, धनश्री देवरे, अलका भावसार, प्रीती कानकुब्जी, प्रतिभा दरपेल, गिरीषा कदम , छाया खेमनर, शिल्पा पुंडे , रोहिणी पुंडे अर्चना लाड, धनश्री देवरे, निर्मला भगत, सुप्रिया निळेकर, सुवर्णा दरपेल, सुनंदा भगत , सपना जाधव , ज्योती काटकर, मनीषा गोसावी , योगिता भोसले, लीना शेळके, अनिता दातीर , मेघा कुलकर्णी , सुनिता अंभोरे आदी अनेक प्रमुख योगसाधिका हजर होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

दत्ता पुंडे

सदरील राज योग समाचार न्युज वेब पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - दत्ता पुंडे 9657783119 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे