महाराष्ट्र
‘दस लक्षण पर्व’ उपवास, व्रत वैकल्ये, मुनींचे दर्शन- प्रवचने ऐकत,धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न.
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
- दस लक्षण पर्व उपवास, व्रत वैकल्ये, मुनींचे दर्शन- प्रवचने ऐकत,धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न.
- कोपरगाव : जैन बांधवांमध्ये पर्वांचा राजा मानले जाते त्या महापर्व पर्युषण ज्याला ‘दसलक्षण’ म्हटले जाते ते अत्यंत आनंद- उत्साहात संपन्न झाले.
- याकाळात अन्नपाणी वर्ज्य करून उपवास केले जातात.
- उपवास ही धार्मिक आचरणातील एक शिस्त आहे. तर मनाची शुद्धी आणि धार्मिक आचरण या दृष्टिकोनातून उपवास केला जातो. उपवास विचार फार प्राचीन काळापासून केला गेला आहे.
- ‘पाप कर्मापासून निवृत्त झालेल्या माणसाचा सदगुणांसह वास म्हणजे उपवास’ ! यात सर्व खान पानादी वर्ज्य करायचे असतात.
- असे उपवास मानव अनिल कुमार कासलीवाल यांनी १६ दिवस केले.
- तर पांडे प्रभादेवी दीपक कुमार यांनी १० दिवसांचे उपवास हेे श्री समेद शिखरजी या पवित्र तिर्थक्षेत्री मुनिंच्या सहवासात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
- हे पवित्र तीर्थक्षेत्र भारतातील झारखंड राज्यात गिरिडीह जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. हे झारखंड राज्यातील सर्वात उंच असलेल्या पर्वत पारसनाथ टेकडीवर आहे.
- जैन पंथीय बांधवांचे हे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जिथे चोवीस जैन तीर्थंकरांपैकी वीस जणांनी मोक्षप्राप्ती केली असे मानले जाते.
- सौ पूजा गौरव कासलीवाल यांनीही १० दिवस उपवास केले. रूपाली बाबासाहेब चिकणे व हर्ष महावीर सोनी यांनी तीन दिवस संपूर्ण अन्नपाणी वर्ज्य करून उपवास केले.या सर्व भावीकांची कोपरगाव शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
- चातुर्मास म्हणजे आपल्या घरातील मोठा आनंदाचा क्षण असे जैन बांधव मानतात त्यासाठी रोजच्या व्यापातून वेळ काढून मुनीश्रींचे दर्शन घेणे, मंगल प्रवचने ऐकणे, रात्री भोजन न घेणे ब्रह्मचर्याचे पालन, स्वाध्याय, जप- तप , साधुसंतांची सेवा करणं , या काळात जैन बांधव असं आचरण करतात.
- त्याला याकाळात अनन्यसाधारण महत्त्व देतात. महाराष्ट्राशीही जैन बांधवांचे नाते अजोड आहे पुरातन आहे. अहिंसा, अनेकांत वाद, शाकाहार अशा उदात्त मानवी मूल्यांचा प्रभाव जैन बांधवांमुळे वाढला. त्याचा जैन बांधवांना सार्थ अभिमान आहे.
- महाराष्ट्रातील संप्रदायातील वारकरी बांधवांशी साधर्म्य असणारे आचरण जैन बांधवही करतात. तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक समाजात जैन बांधवाबद्दल आदर आहे.
- मूळचे राजस्थान आणि गुजरातचे असलेले जैन बांधव व्यवसायामुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यात आढळतात ते ज्या मातीत जन्मले तिथलेच बनून राहिले आहे .संपूर्ण महाराष्ट्रात व कोपरगावातही याचा प्रत्यय येतो.
- कोपरगाव शहरात हे दशलक्षण पर्व संपूर्ण धार्मिक वातावरणात पावित्र्य राखत संपन्न होण्यासाठी दिगंबर जैन समाजाचे पंच श्री महावीर दगडे , श्री अशोक पापडीवाल, गो सेवक अमित लोहाडे , संतोष गंगवात तसेच महिला पदाधिकारी सौ सीमा गंगवाल, पूजा पापडीवाल, अमोल पांडे , बाबासाहेब चिकणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.