शाम वाडी कोकमठाण येथे महिलांसाठी आरोग्य समुपदेशन व योग सत्र संपन्न.
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
शाम वाडी कोकमठाण येथे महिलांसाठी आरोग्य समुपदेशन व योग सत्र संपन्न.
महिलांनी आपल्या आरोग्याची हेळसांड होऊ देऊ नये. सौ. विमल पुंडे (योग शिक्षिका.)
कोपरगाव : महिला ही कुटुंबाचा कणा आहे. ती आरोग्याच्या दृष्टीने निरोगी, सशक्त व सुरक्षित असेल तरच घर सुरक्षित राहील.
संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी माता कामाच्या अति व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे मात्र लक्ष देत नाही.
सुदृढ समाजासाठी महिलांचही आरोग्य महत्वाचे आहे. नवरात्रोत्सव काळात आरोग्य खात्यामार्फत ‘माता सुरक्षित’ अभियान राबविले जात आहे. त्याचा महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांनी केले आहे.
माता सुरक्षित अभियान अंतर्गत महिलांसाठी आरोग्य समुपदेशन, योग सत्र व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
त्या प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी सी एच ओ विनया ढाकणे, मुख्याध्यापक बबनराव भालेराव, निशात इनामदार, रजनी भोसले, आशा गवळी, अजय आडागळे, प्रतिभा महामुनी, मंदा मालकर, आरोग्य सेविका सवीता गलांगे व जुलीया आवारे, आशा सेविका गीता जामदार, सुरेखा जामदार, अरुणा जाधव, मनीषा पवार, राणी मते, अनीता वाघ, वर्षा वाघ, आरोग्य सेवक विशाल धांदरे,
व अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माता सुरक्षित अभियान अंतर्गत सर्व कार्यक्रम आरोग्य अधिकारी डॉ. अनिकेत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत.