माता सुरक्षित अभियान – कोपरगाव येथे विविध आरोग्य विषयक उपक्रमांना सुरुवात.
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राज्यभरात राबवण्यात येत आहे.
कोपरगाव तालुक्यात ही १८ वर्षांवरील महिलांसाठी, माता, गरोदर महिला व महिलांच्या आरोग्याची विविध तपासणी, अगदी कर्करोगाच्या तीन प्रकारच्या तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे वाढलेल्या आरोग्याच्या समस्या ही आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कालावधीत महिलांसाठी विशेष योग सत्रांची सुरुवात झाली आहे.
पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी आदी मणक्यांचे आजारावर महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.
अशा प्रकारे योग सेशन तालुक्यातील मढी बु , देर्डे कोऱ्हाळे, कान्हेगाव, भोजडे, धोत्रे, सांगवी भुसार, धामोरी, चास नळी, नाटेगाव आदी आरोग्य वर्धिनी उपकेंद्रामधे संपन्न झाले. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य अभियानाअंतर्गत महिलांची तपासणी करत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
महिलांची आरोग्य तपासणी सोबतच स्त्रियांच्या आरोग्याविषयीदेखील जनजागृती केली जात आहे.
कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी दिलेल्या निर्देशानुसार तालुक्यातील १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वंकष आरोग्य तपासणीसाठी तालुक्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका झोकून देऊन काम करत आहे.
सुदृढ समाजासाठी महिलांचं आरोग्य हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबाची काळजी घेणारी माता कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. ती निरोगी रहावी, ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी. यासाठी आरोग्य खाते नेहमीच परिश्रम घेत आहे.
या अभियानामुळे त्यास गती देण्यासाठी खूप मदत होईल. असा विश्वास कोपरगाव तालुक्यातील आरोग्य सेवकांना वाटतो.
त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सर्व अधिकारी व आरोग्य सेवक मोठ्या उत्साहाने अभियान यशस्वी करण्यासाठी झटत आहेत.
या आरोग्य महोत्सवानिमित्त सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्री. विकास घोलप यांनी केले आहे.डॉ. घोलप स्वतः जातीने प्रत्येक आरोग्य वर्धिनी केंद्रातील उपक्रमात लक्ष देत आहेत. त्यांचे सहकारी प्रा. आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी डॉ. श्री. नितीन बडदे, डॉ. श्री. सुनील मोरे, डॉ. श्री. राजेंद्र पारखे, डॉ. श्री. अनिरुद्ध तोडकर, डॉ. श्री. अनिकेत खोत, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी , डॉ. रेखा सदाफळ, डॉ. संकेत पोटे, डॉ. वर्षा मेमाने, डॉ. विनया ढाकणे, डॉ. रेणू नागरे, डॉ. अयुब शेख, डॉ. संजीवनी तोडकर, डॉ. किरण भागवत, डॉ. अक्षय गायकवाड, डॉ. संतोषी पावडे, डॉ. सुधीर वाणी, डॉ. गणेश म्हस्के, डॉ. सोनाली पानसरे, डॉ. सुवर्णा काळे, डॉ. नेहा वाघमारे, रविंद्र इंगळे, सुनीता बिडवे, सौ. प्रतिभा वाघ, सौ. आरखडे, सौ. माळी, सौ. आवारे व अनेक सहकारी आरोग्य सेवक हे परिश्रम घेत आहेत.
या अभियानात सर्वात मोलाचं योगदान तालुक्यातील आशा सेविकांच असेल. कारण घरा घरात, वाडी- वस्ती, पाड्या पर्यंत त्यांचा प्रत्येक महिलेशी संबंध येतो. त्या विशेष परिश्रम घेत आहेत.