अमृतवाहिनी फार्मसीत नॅशनल अमृत फार्माथोन संशोधन स्पर्धा संपन्न
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
अमृतवाहिनी फार्मसीत नॅशनल अमृत फार्माथोन संशोधन स्पर्धा संपन्न
देशभरातील 12 विद्यापीठांमधील 450 विद्यार्थ्यांचा सहभाग
संगमनेर (प्रतिनिधी)–मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांच्या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील अमृत फार्माथोन 2024 या संशोधन स्पर्धेत देशभरातील बारा विद्यापीठांमधील 450 विद्यार्थी सहभागी झाले होते.
अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अमृत फार्माथान 2024 या राष्ट्रीय संशोधन परिषदेचे उद्घाटन श्रीबायोस इनोव्हेशन पुणे चे संचालक डॉ. सचिन सकट यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, प्राचार्य डॉ. एम.जे. चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव आदी उपस्थित होते. या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ,गुजरात व महाराष्ट्रातील बारा विद्यापीठांमधील 160 विविध महाविद्यालयातील 450 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.यावेळी बोलताना डॉ सचिन सकट म्हणाले की, औषध निर्माण शास्त्र या विषयात संशोधनास मोठा व्हावा आहे. धकाधकीच्या जीवनामुळे वाढते आजारांचे प्रमाण आणि आरोग्य प्रति नागरिकांचा निष्काळजीपणा यावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट न होणारे व तात्काळ उपचार होईल असे औषध निर्माण करण्यासाठी देशात संशोधन शास्त्रास मोठा वाव आहे.
तर सौ. शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, ग्रामीण भागामध्ये असूनही विद्यार्थ्यांच्या संशोधनास वाव देण्यासाठी अमृतवाहिनी संस्थेने सातत्याने प्रयत्न केला असून आज देशभरातील 450 विद्यार्थ्यांचा सहभाग हा नक्कीच अभिमानास्पद आहे या संशोधन स्पर्धेतून जागतिक पातळीवर दखल घेतले जाणारे संशोधन या ठिकाणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यास्पर्धेत पदवी पातळीवर एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे येथील श्रेया लोहोकरे आणि सहकारी संशोधन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवले. तर संदीप इन्स्टिट्यूट नाशिकच्या वैष्णवी खैरनार आणि सहकारी विद्यार्थ्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर अमृतवाहिनी फार्मसी च्या शुभम गुंजाळ आणि सहकारी विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. आणि दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी लातूरच्या शिवम कुलकर्णी व किसनराव भेगडे फार्मसी कॉलेजला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
पदवीधर विभागांमध्ये राजश्री शाहू कॉलेज फार्मसी बुलढाणा करिष्मा मालुसरे प्रथम क्रमांक, मिळवला तर मॉडर्न कॉलेज पुण्याच्या वैष्णवी पांचाळ यांनी दुसरा क्रमांक मिळवला. तर अमृतवाहिनी फार्मसी च्या गणेश भास्कर यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले .आणि अभिनव कॉलेज ऑफ फार्मसी नरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
तर पीएचडी पातळीवर डी वाय पाटील बायोटेक्नॉलॉजी संस्थेतील प्रियंका वाघ हि ने प्रथम क्रमांक तर अमृतवाहिनी फार्मसी च्या अमोल घोलप यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी व व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम.जे चव्हाण यांनी केले समन्वयक डॉ. विक्रांत निकम यांनी सूत्रसंचालन केले तर राहुल थोरात यांनी आभार मानले
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस पक्षाचे नेते तथा मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ .जे.बी.गुरव आदी सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे