आरोग्यासाठी योग साधना ही एक प्रभावी उपचार पद्धत
कोपरगाव दत्ता पुंडे – गेल्या बावीस वर्षांपासून योग प्रचार प्रसाराचे काम करत असताना प्रसार माध्यमांनी खूप मोलाचे सहकार्य केले. आरोग्यासाठी योग साधना ही एक प्रभावी उपचार पद्धत ठरली असून त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमं प्रभावी कामगिरी बजावत आहेत. म्हणूनच योगाचे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज योग समाचार न्युज पोर्टल चालू करीत असल्याची माहिती योग शिक्षक दत्ता पुंडे यांनी दिली.
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर योग साधीकांचे हस्ते या न्यूज पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सौ. विमल पुंडे, सौ. राजश्री दौलतराव जाधव, ऊमा विजय वहाडणे, अर्चना लाड, गिरीषा कदम, रत्ना पवार, शोभा कानडे, शितल चव्हाण, स्नेहल भोसले, हर्षाली बागड, प्रतिभा वालझडे, स्मिता कुलकर्णी, ज्योत्स्ना धामणे, जयश्री गुजराती, जोती काटकर, रंजना भोईर, सुजाता कोपरे, शितल आमले, कल्पना सोनवणे, वंदना चिकटे, सारीका भावसार, विद्या गोखले, सुमीत्रा कुलकर्णी, भारती शिरोडे, पूजा ऊदावंत, धनश्री देवरे, सुप्रिया निळेकर, रोहिणी पुंडे, कवीता शहा, पल्लवी भगत, सोनाली जाधव, राधीका जाधव, शारदा सुरळे, रत्ना पाठक, ऊर्मिला लोळगे, सुनंदा भगत, आदी अनेक महिला योग साधीका कार्यक्रमास उपस्थित होत्या. निर्मला भगत, अनिता दातीर, स्नेहा इश्वरे, सुवर्णा दरपेल, जया आमले, सुजाता कोपरे, रेणुका आमले, संगीता पंडोरे, अरुणा वाकचौरे आदी अनेक महिला योग साधिका हजर होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिता भुतडा, स्नेहल भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
गृहिणींच्या आरोग्यासाठी योग प्रचार संस्थेचं काम प्रशंसनीय – राजश्री दौलतराव जाधव
कोपरगाव – गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांच्या आरोग्यासाठी सेवा भावी वृत्तीने नि: शुल्क योग वर्ग चालविण्याचं काम करणं हे प्रशंसनीय आहे. हे काम आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजयोग समाचार हे न्यूज पोर्टल अधिक प्रभावी ठरेल. व आरोग्याचे लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. असे मनोगत सौ.राजश्री दौलतराव जाधव यांनी न्यूज पोर्टल लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले.
महिलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी राजयोग समाचार महत्वाची भूमिका बजावेल – अर्चना लाड
कोपरगाव- महिलांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्या बरोबरच व्यक्तिमत्त्व विकासासाठी राजयोग समाचार मधून प्रकाशित होणारी माहिती आम्हां महिलांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायद्याची राहील. असे मनोगत कोपरगाच्या आदर्श शिक्षिका सौ. अर्चना लाड यांनी राजयोग समाचार या न्यूज पोर्टलचे लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले.
सुगरणींसाठी राजयोग समाचारचा तडका भोजनात पोषणमूल्य व स्वाद वाढविल- सौ. विद्या गोखले
कोपरगाव – पाक कलेची आवड असणाऱ्या महिलांसाठी राज योग समाचार मधून विविध रेसिपीच्या टिप्स उपलब्ध होणार असून पाक कौशल्याच्या ज्ञानात निश्चितच खूप भर पडेल. असे मनोगत सौ. विद्या गोखले यांनी व्यक्त केले. त्या पाक कलेच्या जाणकार असून पाक कलेच्या अनेक स्पर्धांमध्ये गोखले यांनी पारितोषिके पटकावली आहेत.
गृहउद्योग करणाऱ्या महिलांना मार्गदर्शनाचे काम राजयोग समाचार कडून होईल – सुमित्रा कुलकर्णी
कुटुंबासाठी अर्थार्जनाचे कामासाठी गृह उद्योगाचा मोठा हातभार लागतो. राजयोग समाचार या न्यूज पोर्टल वरुन त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभणार असल्याचा विश्वास शहरातील प्रसिद्ध पापड उद्योजिका सुमित्रा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.