ब्रेकिंग

कर वसुलीत पालिकेने टोकाची भूमिका घेऊ नये. पालीकेने नागरिकांची माफी मागावी. सौ. विमल पुंडे

संपादक : दत्ता पुंडे ( योग शिक्षक )


कर वसुलीत पालिकेने असे टोकाचे पाऊल उचलू नये : सौ विमल पुंडे

 

कोपरगाव : नगरपालिकेला नागरिकांकडून कर वेळेवर मिळालेच पाहिजेत. यात दुमत नाही. कारण करातूनच नागरिकांना नगरपालिका सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु कर वसुली करताना नागरिकांच्या घरासमोर अशा प्रकारे ढोल बडवणे, थकबाकीदार नागरिकांची जाहीर चौकात फलक लावून अशी निंदा नालस्ती करणे अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करणे हे पालिकेला शोभत नाही.

 

अशा विकृत मानसिकतेतून समाजात द्वेष भावना निर्माण होते. कारण कोणत्याही नागरिकाला कर भरणे चुकत नाही नगरपालिका तो व्याजासकट वसूल करते. नागरिकही हा कर वेळोवेळी भरतात. फक्त काही अडचणी मुळे कधी मागेपुढे होते हे मान्य आहे. म्हणून नागरिकांकडून फार मोठा गुन्हा झाला असे नगरपालिकेने समजू नये.

 

नागरिकांची जाहीर चौकात फलक लावून बदनामी करणे योग्य नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ विमल पुंडे यांनी पालीकेच्या पट्टी वसुली साठी केलेल्या ‘प्रताप’ प्रकरणात व्यक्त केली आहे. खरं तर कर वसुलीसाठी नागरिकांमध्ये प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे. आपल्या नगर पालीकेबद्दल प्रेम, आदर, भाव, आत्मियता निर्माण करूनही कर, पट्टी वसुली होऊ शकते .
असे ढोल बडवून जाहीर निंदा धना नालस्ती करून कोपरगावकरांना अपमानित करणे योग्य नाही. महिला आघाडी अशा कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. व झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करुन माफी मागावी.  यापुढे असे प्रकार घडले तर नगरपालिके विरुद्ध महिला आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सौ. विमलताई पुंडे यांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

दत्ता पुंडे

सदरील राज योग समाचार न्युज वेब पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - दत्ता पुंडे 9657783119 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे