भारतातील ६० % पेक्षा जास्त मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे – एक अहवाल.
संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)
- कोपरगाव :
नागरिकांच्या आरोग्यासाठी असंसर्गजन्य रोगांवरील उपचाराचा वेग वाढवला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आनुवंशिक, शारीरिक, पर्यावरणीय आणि वर्तनात्मक अशा कारणांचा एकत्रित परिणाम असलेले दीर्घकालीन आजार / रोग म्हणजे असंसर्गजन्य रोग होत.
यामध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह आणि श्वसनाशी संबंधित रोग यांचा समावेश होतो.
तंबाखू व अल्कोहोलचे सेवन, प्रक्रिया केलेल्या, साखर व मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन, शारीरिक निष्क्रियता, व्यायामाचा अभाव ,आळस अशा सवयींमुळे असंसर्गजन्य रोगांची शक्यता वाढते. यांना वर्तनजन्य कारणे म्हणतात.
वाढलेला रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील ग्लुकोजचे वाढलेले प्रमाण यांसारख्या चयापचयाशी संबंधित कारणांनीही असंसर्गजन्य रोगांची शक्यता वाढते.
बैठी कार्यशैली, मोकळ्या जागेचा आणि मनोरंजनाचा अभाव, तणावपूर्ण कार्यालयीन वातावरण, प्रदूषण हे रचनात्मक घटकही असंसर्गजन्य रोगांची शक्यता वाढवतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि स्ट्रोक यांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा, अगदी तालूका पातळीपर्यंत यंत्रणेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
कोपरगाव तालुक्यातही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्रामधे उपाय योजना चालू आहेत. यासाठी जे रुग्ण दवाखान्या पर्यंत येत नाहीत त्यांच्या साठी वाडी वस्ती वर NCD कॅंप आयोजित करणे, रक्त शर्करा, ग्लूकोज ची मात्रा व रक्तदाब मापन , योग सेशन आयोजित करणे, महिलांसाठी कर्करोगाच्या निदानासाठी V I test, पुरुषांच्या तोंडाच्या कॅन्सर साठी तपासणी व ओपीडी मध्येही परिश्रम घेतले जात आहेत.
प्रत्येक वाडी वस्ती पर्यंतच्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा मिळाव्यात याचा प्रयत्न केला जात आहे.
यासाठी पोहेगाव आरोग्य अधिकारी डॉ. श्री. नितीन बडदे, चासनळी आरोग्य अधिकारी डॉ. श्री. सुनील मोरे साहेब, वारी आरोग्य अधिकारी डॉ. श्री. राजेंद्र पारखे साहेब, टाकळी आरोग्य अधिकारी डॉ. श्री.अनिरुद्ध तोडकर साहेब, संवत्सर आरोग्य अधिकारी डॉ. श्री. अनिकेत खोत, CHO डॉ. रेणू नागरे, डॉ. तोडकर, डॉ. अयुब शेख, डॉ. सोनाली पानसरे, डॉ. गणेश म्हस्के, डॉ. सुधीर वाणी, डॉ. किरण भागवत, डॉ. अक्षय गायकवाड, डॉ. संतोषी पावडे, डॉ. रेखा सदाफळ, डॉ. संकेत पोटे, डॉ. वर्षा मेमाने, डॉ. ढाकणे, डॉ. सुवर्णा काळे, डॉ. नेहा वाघमारे, आदी सामुदायिक आरोग्य अधिकारी तर रमेश इंगळे, सुनीता बिडवे, सौ. वाघ, आरखडे, माळी आदी अनेक आरोग्य सेवक व अनेक आशा सेविका अहोरात्र परिश्रम घेत आहेत.